Ahmednagar News: स्व.शंकरराव घुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) - हमाल-मापाडी यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्व.शंकरराव घुले यांचे मोठे योगदान राहिले आहे. ज्यावेळी हमालांना वेठबिगारांसारखी वागणुक दिली जात होती, त्यावेळी स्व.शंकरराव घुले यांनी मोठे आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. तसेच हमालांच्या पाठिंवरील ओझे कमी करण्यासाठी मोठा संघर्ष केला. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पत मिळवून दिली. त्याचप्रमाणे दवाखानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली.
रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅण्ड, मालधक्का, बाजार समिती तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना एकत्र करुन मोठे संघटन निर्माण केले. कष्टकार्यांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी राहिल, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
स्व.शंकरराव घुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता वामन, अशोक औशिकर, अर्जुनराव शिंदे, हर्षल म्हस्के आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, हमाल-मापाडी, कष्टकरी यांच्या हक्कासाठी जीवनभर संघर्ष करुन स्व.शंकरराव घुले यांनी त्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून दिले. कष्टकर्यांची जीवनमान उंचवावे, त्यांची सर्वांगिण प्रगती व्हावी, यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध पातळ्यावर लढा देऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. अण्णांचे कार्य त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून कायम स्मरणात राहील, असे सांगितले.
याप्रसंगी अभिषेक कळमकर, दत्ता वामन आदिंनीही मनोगत व्यक्त केले. हर्षल म्हस्के यांनी आभार मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com