शिवसेनेचे प्रा.विशाल शितोळे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
(Photo Rutuja Ahmednagar)अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रोफेसर कॉलनी ते गुलमोहोर रोड रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवर दुभाजक बसविण्यात यावे तसेच हायमास्ट बसविण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रा. विशाल शितोळे यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, महेश लोंढे, अजिंक्य गायकवाड, ओंकार शिंदे, सागर साव आदि उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रोफेसर कॉलनी, गुलमोहोर रोड, तोफखाना पोलिस चौकी, भिस्तबाग रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतुक वाढत आहे. रस्त्यांवर दुभाजक नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्यावर दुभाजक असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे येथील स्ट्रीट लाईटचे काही खांबांना वाहने धडकल्याने ते वाकले आहेत.
त्यामुळे जुने झालेले स्ट्रीट लाईटचे खांब बदलण्यात यावेत. त्याचप्रमाणे प्रोफेसर कॉलनी चौकात मोठा हायमस्ट बसविण्यात यावी. या रस्त्यांवर पार्किंग झोन नसल्याने बेशस्त वाहनांची पार्किंग होत आहे, मनपाने या भागात ठिकठिकाणी पार्किंग झोन निर्माण करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com