SHRIRAMPUR श्रीरामपूरात ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनची बैठक संपन्न
श्रीरामपूर प्रतिनिधी: येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटच्या समता हॉलमध्ये ऑल इंडिया मुस्लीम ओबीसीं ऑर्गनाइजेशन अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने ओबीसी समाजाच्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ओबीसीसह इतर बलुतेदार समाजाच्या रिसर्च अभ्यासक तथा ओबीसी,भटके,विमुक्त, अशा जवळपास ४८ मुस्लिम बलुतेदार समाज जमातींचा अभ्यास करुन त्यावर पुस्तके लिहिणाऱ्या पुणे येथील नामवंत लेखिका श्रीमती तमन्ना इनामदार या उपस्थित होत्या. या वेळी ओबीसी समाजाच्या विविध समस्या,अडचणी तसेच शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना श्रीमती तमन्ना इनामदार म्हणाल्या की, मुस्लिम समाजामधील अनेक पोटजाती असुन त्या मोठ्या प्रमाणात विखुरल्या गेल्या आहेत,याविषयी मी सखोल माहिती घेत अभ्यास करुन त्यास शब्दबद्ध करत पुस्तके प्रकाशित करत आहे, आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाले असुन आणखी बरीच पुस्तके प्रकाशित करावयाची आहे,यासाठी मी गत पाच वर्षांपासून स्वखर्चाने संपूर्ण राज्यभर दौरे करत संबंधित जमातीच्या प्रमुखांशी भेटी घेत त्यांच्या जमातीविषयी माहिती संकलित करत आहे, मुस्लिम समाजातील विखुरलेल्या अशा विविध समाज जमातींनी एकत्र येत आपले हक्क अधिकार समजून घेतल्यास येणाऱ्या पुढील पिढीचे भविष्य हे उज्वल ठरेल असेही त्या म्हणाल्या.
यासोबतच ॲड. मोहसीन शेख यांनी समता फाऊंडेशनच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध जनकल्याणासाठी कार्यांची माहिती विषद केली.राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट द्वारे चालविले जात असलेले विविध विधायक कार्यांबाबत विविध सामाजिक संघटनांच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख आणि समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट चे संचालक ॲड. मोहसिन शौकत शेख यांचा सत्कार ही करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक ॲड. मोहसीन शौकत शेख होते.जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागबान यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल इस्माईल काकर यांनी केले. यावेळी ओबीसी ऑर्गनाइजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अंसारी यांनी सलग ४० वर्षे मुस्लीम व ओबीसी समाजाची सेवा केल्याबद्दल त्यांना शासनाच्यावतीने संविधान रत्न या सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याबाबत या वेळी अभिनंदन ठराव करण्यात आला.
यावेळी पत्रकार शौकतभाई शेख, इसाकभाई अत्तार, बामसेफ चे मुश्ताकभाई तांबोळी, अमीर बेग मिर्जा,हैदर इमाम काकर, मुख्तार मणियार, डॉ.सलीम शेख, जावेद काकर,अब्बास शेख, आरिफ पठाण,अमजद पठाण, राजू काकर,राहाता येथील शौकतभाई तांबोळी, समीरभाई तांबोळी, रियाज अंसारी, इम्रान इराणी, सलीम शेख, फिरोज पोपटीया, युसुफ लाखानी, रिजवान मेमन,गुफरान बागबान, मो.शफीक अन्सारी, रेहान शेख असे विविध जमातीचे प्रमुख मान्यवर आदी उपस्थित होते.
शेवटी शौकतभाई शेख यांनी आभार मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com