साई प्रतिष्ठानतर्फे बालकांना बक्षीसे, खाऊ वाटप करुन समारोप
वसंत टेकडी येथील साई मंदिरात गेली 15 दिवस साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आयोजित क्रिएटिव्ह टॅलेंट या संस्कार शिबीरात सुमारे 100 च्यावर मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. त्याचा समारोप सहभागी असणार्या सर्वांना बक्षिसे, खाऊ वाटप करुन करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता तापकिरे, स्वाती पवळे, हभप राजश्री कडलग, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, बाल गायिका साक्षी नरवडे, बालगायक पुष्कर पाथरे आदि उपस्थित होते.
यावेळी साई-बाबांची आरती नववधू-वर सौ.ऋतिका व श्री.किरण पिंपळे, सौ.श्रावणी व श्री.विकी दुलम, सौ.वैष्णवी व श्री.अक्षय आरकल, सौ.आश्विनी व श्री.आकाश पालवे यांचे हस्ते करण्यात आली.
प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, साईबाबांच्या कृपाशिर्वादाने वर्षभर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु असतात. नागरिकांचा मोठा सहभाग मिळत आहे. बाल संस्कार शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. संस्काक्षम पिढी घडविणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
यावेळी दत्ता तापकिरे यांची नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणाले, यंदा देखील बालसंस्कार शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये विविध शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी शिबीरामध्ये प्रार्थना, सेल्फ डिफेन्स, ड्रॉईंग, क्राफ्ट, लाठीकाठी, तलवार बाजी, दांडपट्टा व मुलांचे डान्स, योगा प्रशिक्षण संपन्न झाले. तसेच मुलांची एक दिवसाची सहल काढण्यात आली होती, त्याचाही मुलांनी आनंद घेतल्याचे सांगितले.
शिबीरासाठी गणेश चिलका, स्वाती आव्हाड, संगिता जाधव, ऐश्वर्या वंगा, भाग्यश्री जाधव, प्रतिक भालेराव, प्रज्ञा अष्टेकर, अनिकेत जाधव, सिद्धीता दरेकर, मच्छिंद्र साळूंखे, डॉ.अश्विनी जाधव, संदिप क्षीरसागर, मनिषा कांगणकर आदिंनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना दिनकर यांनी केले तर आकाश त्र्यंबके यांनी आभार मानले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com