हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे अहमदनगर येथे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी) : हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे अहमदनगर येथे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कष्टकरी हमाल-मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात एकदा नगरला हे अधिवेशन घेण्यात आले होते. आता पुन्हा आज रविवारी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्वैवार्षिक राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके,आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.
काल मी बंगळुरूला होतो. कर्नाटकात नवीन राज्य आलं. माणसांत विदि्वेष वाढवायचे काम तेथील आधीच्या सरकारने केले. अनेकांना वाटत होते की या निवडणुकीत सत्ताधारी जिंकणार. पण सामान्य माणसांच राज्य आता तेथे आलं आहे. कालच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास एक लाख लोक उपस्थित होते.
विशेष म्हणजे यामध्ये 70 टक्के तरुण विविध जाती धर्मांचे होते. हे घडलं कशामुळे त्याचं कारण कष्टकरी माणसांची एकजूट. जर कर्नाटकात अशी एकजूट होऊ शकते तर अन्य राज्यात कशी होत नाही हे पाहण्याचा काळ आता आला आहे, अशा सूचक शब्दांत त्यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारीचे संकेत दिले.


0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com