Guru Purnima: गुरु पौर्णिमेनिमित्त मंदिरात दर्शनाला गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त श्री स्वामी समर्थ सारअमृत पारायण सोहळा पार पडला या सामुहिक पारायण करीता महिला मोठया संख्येने बसल्या होत्या.
गुरुपर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांना पहाटे लघुरुद्र, होमहवन, महाआरती होवून महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वामी भक्त, शंकर भक्त तसेच भाविकांनी दिवसभर दर्शनाला गर्दी केली होती. प्रचंड मोठी गर्दी झाली होती तरी सर्व भक्त शिस्त बद्ध रांगेत उभे राहून स्वामींच्या नावाचा जयघोष करीत दर्शन घेतले.
रात्रीं संत नामदेव महाराज भजनी मंडळाच्या वतीने गायनाचा कार्यक्रम पार पडला अनिता बावधने व सहकारी यांनी सुंदर भजने गात सर्वांची मने जिंकली. महाराजांची शेज आरती होवून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com