कर्तव्य समजून गरजूंना मदत करायला हवी- डॉ रेशमा चेडे
ZP School: अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजामध्ये गरजूंना मदत करणार्यांची संख्या वाढली आहे. पण लोक मदत करणे म्हणजे उपकार समजून करायला लागले आहे. ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ रेशमा चेडे यांनी केले.
मखदुम सोसायटी व मराठा सेवासंघ च्यावतीने स्वतंत्रता सेनानी शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा वैदुवाडी मधील विद्यार्थ्यांना वह्या,पाटया वाटप करण्यात आले. याप्रसंगी जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे, डॉ.रेश्मा चेडे, मुस्कान फाउन्डेशनचे शफकत सैय्यद,मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मिनाक्षी जाधव,खंडागळे सर, कल्पना कांबळे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ चेडे म्हणाल्या की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजा कार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो, असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. प्रास्तविक मिनाक्षी जाधव यांनी केले तर आभार शफकत सैय्यद यांनी मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com