Ahmednagar Bollywood Dandiya: क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने दि.५ नोव्हेंबर रोजी महिलांसाठी बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन
Ahmednagar Bollywood Dandiya: अहमदनगर (प्रतिनिधी): शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी व झुंबा फिटनेस च्या वतीने शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंधन लॉन्स येथे बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक दिनेश फिरके यांनी दिली.
हा बॉलीवूड दांडिया नाईट फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना एक हक्काचा व्यासपीठ मिळावा या हेतूने हा बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन करण्याचा उद्देश आहे. यामध्ये विविध दांडिया व गरबाचे प्रकार खेळण्यात येणार आहे.
तसेच महिलांसाठी फूड स्टॉल सुद्धा ठेवण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या दांडिया नाईट मध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले आहे. या बॉलीवूड दांडिया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशसेवा करणारे कर्नल व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
या बॉलीवूड दांडिया नाईट साठी बंधन लॉन्स, नगरी व्हिलेज, हॉटेल कृष्णा एस्कोटीका, Nagri कॅफे , यांनी प्रायोजकत्व केले आहे. या बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये सहभागी होण्यासाठी हॉटेल नगरी व्हिलेज क्रियेटर डान्स अकॅडमी अँड ड्रेपरी येथे फ्री पास मिळतील. अधिक माहितीसाठी 81 49 99 91 49 यांच्याशी संपर्क साधा.
या कार्यक्रमासाठी देव शिंदे फोटोग्राफी, शरण झुंबा फिटनेस, क्रिएटर्स ड्रेपरी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com