Ahmednagar: पैगंबर जयंतीनिमित्त सर्जेपुरा कौलारु कॅम्प येथे महाप्रसादाचे वाटप
Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी): येथील सर्जेपुरा कौलारू कॅम्प, सुलतान चौक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त मसजीद-इमाम यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी हाजी वसीम, अकिलभाई, राजू भाई, जफर भाई, अब्रार खान, मतीन सय्यद, मतीन शेख, हाजी नदीम, आसिफ भाई, लतीफ भाई, तनवीर शेख, तोफिक शेख, तबरीज शेख, अरबाज शेख, सोनू उस्मान, सोफियान हासिफ, शहबाज उस्मान, मोसिन शेख, शाहरुख शेख, सलमान शेख आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर शहराला सण-उत्सवाची मोठी पार्श्वभुमी आहे, नगरमधील सर्वधर्मिय उत्सव हे एकत्रित साजरे केले जातात. यंदा गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती एका दिवशी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांनी सद्भावनेचे दर्शन घडविले.
मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती गणेश विसर्जनच्या दिवशी साजरी न करता आज रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू-मुस्लिम एकतेचे व समन्वयाचे हे मोठे उदाहारण आपणास पहावयास मिळले. सर्जेपुरा कौलारु कॅम्प, सुलतान चौक येथे यंग पाटीच्यावतीने सर्वधर्मियांसाठी महाप्रसादाचे (भंडार) वाटप करुन सर्वधर्मियांना यात सहभागी करुन घेतले. परिसरातील सर्वधर्मियांनी मोठ्या उत्साहाने पैगंबर जयंती साजरी केली.
या प्रसादाचा लाभ हिंदू-मुस्लिम सर्व समाजाचे लोकांनी घेतला. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com