Dr.Paulbudhe Pharmacy: डॉ.पाउलबुधे फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता सप्ताह साजरा
Dr.Paulbudhe Pharmacy: अहमदनगर (प्रतिनिधी): वाढती शहरे, वसाहती यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला. दळवणवळाच्या दृष्टीने रस्ते, उड्डाणपुल यांच्या उभारणीमुळे रस्त्यालगत दुतर्फा असणारी झाडे तोडली यामुळे ऋतुंमध्ये बदल होत आहे.
वृक्ष लावली ती जगवलीतरच भविष्यात आपल्याला ऑक्सिजन मिळेल. पर्यावरण ठिकविण्यासाठी ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियमचे अध्यक्ष डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.एन.जे.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी 100 विविध झाडांचे वृक्षरोपण व झाडांची लायब्ररी उपक्रम पार पडला. याप्रसंगी अध्यक्ष डॉ.सुदर्शन गोरे, हेमंत नरसाळे, विजय माळी, विश्वस्त रामकिसन देशमुख, बी.एड्.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी.फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.गोरे यांनी वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांवर आहे. एक विद्यार्थी, एक झाड उपक्रम कॉलेज परिसरात 100 झाडे लावून प्रत्येक एकाने एका झाडाचे संगोपन करावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.निलेश जाधव यांनी या उपक्रमाचे महाविद्यालय यशस्वीपणे नियोजन करुन सर्व वृक्षांची जबाबदारी घेतली, असे सांगितले.
जागतिक औषध निर्माता सप्ताहात विविध उपक्रम राबविले. यामध्ये ‘अंगदान महादान’ विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमोल घोलप यांचे व्याख्यान झाले. तर अध्यात्मिक विषयावर ‘भगवद्गीता ध्यानसाधना’ यावर एच.एच.स्वामी प्रत्यानंद महाराजांनी सुंदर व्याख्यान दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा या हेतूने प्रश्नमंजुषा, निबंध, घोषवाक्य, व्हिडिओ मेकींग अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना सर्वांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. या सप्ताहात विविध कार्यक्रमासाठी नॅशनल कन्व्हेनर अनिकेत शेळके, अभाविप चे शहर मंत्री आनंद गांधी, संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास सेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, प्रा.दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
-compressed.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com