NCP Maharashtra: अजित पवार गटाच्या पत्राला शरद पवार गटाचे प्रतिउत्तर        


NCP Maharashtra: अजित पवार गटाच्या पत्राला शरद पवार गटाचे प्रतिउत्तर


     

NCP Maharashtra: राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना सोडून पुतणे अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस झाले त्यानिमित्त अजित पवार यांनी ट्विटरवर महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद म्हणून एक पत्र प्रकाशित केला. त्या पत्राला राष्ट्रवादीच्या ट्विटर अधिकृत हॅण्डलवरून प्रति उत्तर देत ताशेरे ओढण्यात आले.


सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांचं हे पत्र राष्ट्रवादीच्या अधिकृत लेटरहेड आणि घड्याळ चिन्हासह प्रकशित केले. आता अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शरद पवार गट राष्ट्रवादी असे दोन गट झालेले आहेत परंतु अधिकृत  चिन्ह आता कोणी वापरायचे आणि अधिकृत नाव कोणाकडे राहील हि कोर्टात गेलेली बाब.


 परंतु अजित पवार यांचा घड्याळ  आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एनसीपी स्पिक्स वरून अजित पवार यांच्या पत्राला उत्तर देताना वापरलेले घड्याळ हा तिढा सुटता सुटत नाही किंबहुना  ठाकरे गट आणि शिंदे गट प्रमाणे शिवसेना आमचीच अशा स्थितीत येऊन पोहोचलेला आहे. आपल्या माहितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र आणि त्याला राष्ट्रवादीचे उत्तर दोन्हीही जोडत आहे.  


राष्ट्रवादीने दिलेल्या प्रतिउत्तरात काही मुद्दे पुढील प्रमाणे  

१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण असं म्हणत गेल्या १०० दिवसांत सरकारकडून झालेल्या कृतींची दखल घेण्यात आली आहे.

 “१०० दिवस छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचे,

 १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार

 असंवेदनशील सरकारसोबतचे, १०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे, 

१००दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, 

समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणाविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे”, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.


“१०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे”, अशी टीकाही त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

“पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. 

जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात. कितीही मोठं संकट आलं तरी विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे”, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र 


 १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण अजित पवार गटाच्या पत्राला शरद पवार गटाचे प्रतिउत्तर