Ahmednagar BJP: सुडके मळ्यात  स्वस्त दरातील डाळ केंद्रास चांगला प्रतिसाद 

Ahmednagar BJP: सुडके मळ्यात  स्वस्त दरातील डाळ केंद्रास चांगला प्रतिसाद
                                                                                                        (Photo Mahesh Kamble Ahmednagar)

          Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) -दिवाळी सणानिमित्त शासनाच्यावतीने नागरिकांसाठी अल्प दरात डाळ उपलब्ध करुन दिली आहे.त्याचबरोबर रेशन दुकानांमधून आनंदाचा शिधाही उपलब्ध करुन देण्यात आला  असल्याने नागरिकांची दिवाळी गोड झाली आहे,


सुडके मळा येथील आर्यन गार्डन मध्ये  परिसरातच नागरिकांसाठी डाळ वाटप केंद्र सुरु केल्याने मोठी सोय झाली होती त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असे संयोजक ज्योती दांडगे व सुजाता औटी यांनी सांगितले 


             याठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना स्वस्त दरामध्ये हरबरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी  माजी महापौर बाबासाहेब वाकळे,युवा नेते सुरेंद्र गांधी,मा शहर अध्यक्ष भैय्या गंधे,श्री काळे,पिटू बोरा,कालिंदी केसकर  नगरसेवक अजय चितळे व नागरिक उपस्थित होते.


याप्रसंगी  ज्योती दांडगे म्हणाल्या शासनाच्यावतीने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत,त्याचा लाभ संबंधितांपर्यंत मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशिल आहोत