Satkar: आगळ्या वेगळ्या सत्काराने संजय राऊत भारावले
अहमदनगर (प्रतिनिधी )-येथील नक्षत्र लॉन येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा.संजय राऊत हे आले होते.
या निमित्ताने जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने त्याचा आगळ्या वेगळ्या सत्कार जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आला त्यामुळे संजय राऊत भारावले
खा राऊत यांना पगडी, मण्यांचा हार, भगवी शालघालून व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वारकरी व कार्यकर्ते उपस्थित होते
--

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com