Ahmednagar BJP: भाजप युवा वॉरियर्स शहर जिल्हाध्यक्षपदी यशवंत खैरे
Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या युवा वॉरियर्स शहर जिल्हाध्यक्षपदी यशवंत विकास खैरे यांची नियुक्ती करुन प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर बोचूघोळ, प्रशांत मुथा, महेश नामदे, रुद्रेश अंबाडे, सुजय मोहिते, सुरेश लालबागे, आदेश गायकवाड, विजय गायकवाड, पंडित खुडे, मयूर पाचपुते, तेजस आव्हाड, सिद्धांत झेंडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले, देशातील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असून, अनेक राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी करावे. पक्षात चांगले काम करणार्यांचा योग्य सन्मान होत असतो. नगरमध्ये युवकांची मोठी ताकद भाजपाच्या मागे आहे. भाजपाचे युवा वारियर्स हे पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे पदाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, भाजपाचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील युवकांचे संघटन करण्यात युवा वारियर्सची महत्वाची भुमिका राहणार आहे. आज नियुक्त झालेले यशवंत खैरे यांनी युवकांचे चांगले संघटन केले आहे, पदाच्या माध्यमातून त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. ते पक्ष कार्यात चांगले योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
नियुक्तीनंतर यशवंत खैरे म्हणाले, भाजपा पक्षाने आपणावर मोठी जबाबदारी दिली आहे, या पदाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाल युवकांचे संघटन करुन पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करु. युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकर घेऊ, असे सांगितले.
या निवडीबद्दल यशवंत खैरे यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, भैय्या गंधे आदिंनी अभिनंदन केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com