शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत मनपा आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी) | अहमदनगर महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत गाळेधारकांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि अ.नगर महानगर पालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे धारका कडुन घटनाबाह्य अवाजवी भाडे वाढ आकारणी झालेली असून, सदर आकारणी कमी करावी तसेच, तसेच गाळेधारकांचे मालक महानगरपालीका असताना भाडे धारकाकडुन घरपट्टी व इतर कर घेऊ नये,गाळे धारकांना रेडीरेकनर नुसार दर आकारणी करू नये,पक्के बांधकाम असलेले गाळे तसेच पत्र्याची शेड व टप-या असलेले या गाळ्यांचे वर्गीकरण करून दर ठरवावे,२०१६-१७ ला ज्या भाडे रु.९९० होते त्या गाळेचे भाडे ५४८८ रु.करण्यात आलेले आहे.
फार मोठी तफावत आहे ती कमी करण्यात यावी,गंजबाजार शॉपिंग सेंटर जुने दर रु २८९ होते ते ३०००० पर्यंत वाढवण्यात आले आहेत ही तफावत फार मोठी आहे.तसेच सदर गाळे १०० वर्षापुर्वीची आहेत,२०/७/२०१८ रोजी झालेल्या महासभेत प्रस्ताव क्र.३(प्रस्तावाचा विषय-गाळे धारकांचे भाडे कमी-करून मिळणे बाबत्) सविस्तर चर्चा होऊन झालेल्या प्रमाणे कार्यवाही झालेली नाही.
तरी आपण या बाबतीत सहानभुतीने विचार करून अवाजवी अन्याय कारक भाडेवाढ थांबवावी व योग्य निर्णय घ्यावा,सदर गाळेधारकांच्या वतीने मा.प्रशासक साहेबांनी फेर प्रस्ताव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत वसंत लोढा,राजेंद्र नगरकर,अनिल सबलोक चेतन गांधी,देशमुख सराफ,अमृत मुथ्था,चेतन गांधी,राजेंद्र धावडे,अनिल जग्गी,मनोज देवळालीकर,दिलीप मुथ्था,नीरज राठोड,सय्यद यसुफ,सय्यद सुफियान,संजय धुप्पड,शाकीर सय्यद,गोविंद राठोड,सुहास पाथरकर,बाळासाहेब खताडे,नासिर शेख आदींनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी बोलताना लोढा म्हणाले आज सुमारे १२५च्या वर गाळेधारक उपस्थित होते,अवाजवी भाडे आकारणी कमी करावी हि आमची प्रमुख मागणी आहे ती मान्य झाल्यास त्वरित गाळेधारक भाडे भरतील असे आम्ही आयुक्ताना सांगितले,रेडीनेकर,शासन परिपत्रक थांबवावे व योग्य तो निर्णय घ्यावा असे आयुक्तांना सांगितले.चर्चा चांगली झाली व आयुक्तानी सर्वांचे मत ऐकले व ७ मार्च पर्यंत योग्य ती आकारणी करू असे आश्वासन दिले.
आयुक्त म्हणाले मला शासनाने दिलेल्या अधिकारा प्रमाणे व नियमाने भाडे आकारणी करण्याचा प्रयत्न करू यावेळी उपायुक्त बांगर याना फेर सर्व्हे करून आकारणीचा प्रस्ताव ताबोडतोब देण्याचे आदेश दिले आहेत व ७ मार्च पयंत निर्णय घेऊ असे ते म्हणाले यावेळेस गाळेधारक म्हणाले योग्य आकारणी झाली तर ४ दिवसात १० कोटींचा कर गाळेधारक जमा करतील
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com