Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिका लटके हीच्या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
अहमदनगर (प्रतिनिधी) - बारामती येथे स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये ‘माझे महाविद्यालय-आमचा उत्कृष्ट उपक्रम’ या स्पर्धेत विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालाची कु.रसिका लटके ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र पवार, सचिव सौ.सुनंदा पवार, इंद्रजित देशमुख, सविता व्होरा उपस्थित होते.
सदर स्पर्धेत सारिका लटके हीने ‘कल्टीवेशन ऑफ ऑयस्टर मशरुम’ या उपक्रमाचे पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सादरीकरण केले होते. यामध्ये प्रकल्पाचे आहारातील महत्व, उत्पादन, रोजगार निर्मिती तसेच बाजार पेठेतील मागणी यावर भर दिला. या उपक्रमास सदर स्पर्धेत प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत, प्रा.एस.बी.डमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदाबाई पवार महिला कॉलेज व पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळा यांच्या संयुक्त विद्यमाने युवतीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्राची ओळख व्हावी व या क्षेतात बदल घडावा, युवतीमधील नेतृत्व घडावे या उद्देशाने स्वयंसिद्ध संमेलनाचे आयोजन बारामती येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात कु.रसिका लटके हीचा सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल कु.रसिका लटके व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., संचालक डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com