Firodiya School: समृद्धी नजान हिने पाच पारितोषिक मिळवत विविध स्पर्धेत यश
अहमदनगर - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता 2 री मधील विद्यार्थीनी कु.समृद्धी सोमनाथ नजान हिने शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पाच पारितोषिके प्राप्त केले. शाळेचा शेष पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
यामध्ये कु.समृद्धी हीला मराठी कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक, ‘मी गणपती आहे’ सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, इंग्रजी पाठांतर स्पर्धा द्वितीय, इंग्रजी कथाकथन स्पर्धेत तृतीय, धावणे स्पर्धेमध्ये तृतीय अशा विविध स्पर्धेत तिने सुयश प्राप्त केले.
तिच्या या यशाबद्दल प्राचार्य प्रभाकर भाबड व प्रमुख पाहुण्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका सौ.प्रतिभा कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपप्राचार्या कविता सुरतवाला उपस्थित होत्या.
शाळेतील विविध स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते , यामध्ये कु.समृद्धी हीने हे यश संपादन केले. समृद्धीने ज्या स्पर्धमध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये तिला यश प्राप्त झाले. समृद्धीला वर्गशिक्षिका अर्चना जाधव व विविध विषय अध्यापिका, स्पर्धा प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. आई सुरेखा सोमनाथ नजान नेहमी तिला प्रोत्साहन देत असते.
कु. समृद्धी हिचे भाऊसाहेब फिरोदियाचे प्राचार्य उल्हास दुगड, रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलालजी मनियार, गीता परिवार दक्षिण अहमदनगच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई सोमाणी, समृद्धीचे आजोबा शिवाजीराव कजबे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
कु. समृद्धीला चित्रकला, नृत्य, कथाकथन, हस्तकला, वकृत्व, खेळ ,नाटक अशा विविध गोष्टींची आवड आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com