Gulmohar Road: शिलाविहारला दि.14 पासून गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव हरिनाम सप्ताहास प्रारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी) - सावेडी उपनगरातील शिलाविहार येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात दि. 14 फेब्रुवारी 2024 पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. या सप्ताहात पारायण सोहळा, अखंड नाम जप, दुपारी महाप्रसाद होईल.
21 फेब्रुवारी रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे शिलाविहार येथे 7 दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ‘श्रीं’च्या ग्रंथ वाचनास बुधवार दि. 14 पासून सकाळी 9 ते 11 पारायण सुरु होईल. व्यासपीठ चालक मनिषाताई भोंग हे अध्यायांचे वाचन करतील. ज्यांना पारायणास बसायचे आहे, अशांनी विजय मते (मो.9225322389) यांच्याशी संपर्क साधावा; म्हणजे ग्रंथ उपलब्ध करता येईल.
24 तास श्रीराम जय राम जय जय राम नामाचा जप सेवाभावी मंडळाचे सदस्य करणार आहेत. तासा-तासाने भाविक नामजपास बसतात. अशा या अखंड हरिनाम सप्ताहास रोज दुपारी 12 वा. महाआरती होईन, महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सुंदरदास रिंगणे यांनी केले आहे.
दि.21 रोजी सकाळी जन्मोत्सव, पालखी मिरवणुक, स. 10 वा. हभप मनोहर सिनारे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल, असे हभप सौ.रेखाताई रिंगणे, प्रसाद देवा यांनी सांगितले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com