फुलसौंदर मळा येथे महाशिवरात्रीनिमित्त दि. 2 पासून हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी) - बुरुडगाव रोड, फुलसौंदर मळा, शिवपंचायतन मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे 2 ते 9 मार्च 2024 दरम्यान आयोजन केले आहे. सप्ताहात काळात पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 8 ते 9 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 9 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे.महाशिवरात्री उत्सवाचे हे 25 वे वर्ष आहे.
या पारायण सोहळ्यात शनिवार दि. 2 रोजी हभप माऊली महाराज पठाडे (कर्जत), दि. 3 रोजी हभप हरिभाऊ बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगांव माळवी. दि. 4 रोजी हभप मुक्ताताई म.चाळ व हभप शिवानीताई म.चाळक (शिरुर), दि.5 रोजी हभप समाज प्रबोधनकार यशवंत महाराज थोरात (पारनेर),
दि. 6 रोजी हभप रामकृष्ण महाराज रंधवे (पाटोदा), दि. 7 रोजी हभप डॉ.राधाकृष्ण महाराज अकोलकर (पैठण), दि. 8 रोजी हभप रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा (बीड) आदि किर्तनकार आपली सेवा सादर करणार आहेत.
शनिवार दि.9 रोजी हभप रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज रासकर (श्रीक्षेत्र रामलिंग) यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12.30 यावेळेत होईल. हे सर्व कार्यक्रम शिवपंचायतन मंदिर, फुलसौंदर मळा, बुरुडगांव रोड, अ.नगर येथे होणार असून,
या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, विष्णू फुलसौंदर, दिलीप माडगे, राजू फुलसौंदर, भास्कर गायकवाड, अलिन साळूंके, नाना इंगवले, सुनिल राऊत, दिपक फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, सुनिल फुलसौंदर, अवधुत फुलसौंदर यांनी केले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com