Parner News: जय मल्हार विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
अहमदनगर (प्रतिनिधी) -पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील जय मल्हार विद्यालयातील दहावीला मार्च २०२४ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. ही विद्यालयाची २४ वी अधिकृत बॅच आहे.या विद्यालयाची निकालाची उत्कृष्ट परंपरा याही वर्षी विद्यार्थी जोपासतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुंबरे सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त ऍड पांडुरंग गायकवाड हे होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य तानाजी मुळे,भगवान भांबरे,बंडूकाका पाटील, हनुमंत जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यालयातील इयत्ता ,आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून विद्यालयाविषयींच्या भावना व्यक्त केल्या.काहीशा भावनिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला,या वर्गाचे वर्गशिक्षक श्री गरकळ सर,श्री उंडे सर,श्री जरांगे सर, व श्री केदारी सर, भगवान भांबरे यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा प्रदान केले.
श्री सुंबरे सर यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे तसेच भविष्याबद्दल मार्गदर्शन केले.ऍड . पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यश संपादन करत असताना आपले चारित्र्य जपावे,तसेच कुठल्याही व्यसनांना बळी पडू नये आणि आपली शाळा, आपला गाव याबाबत विद्यार्थ्यांनी नेहमी सजग असावे असे सुचित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थ्यांनी शेख अलिशा शरीफ व राजदेव ऋषाली राजाराम यांनी केले, तर आभार विद्यार्थिनी सानिया मन्सूर चौगुले यांनी मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com