Sant Nirankari: निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अहमदनगर मध्ये सोमवारी प्रवचन
अहमदनगर (प्रतिनिधी) - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत येत्या सोमवार दि.5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत भिस्तबाग महाल समोर, तपोवन रोड, नगर येथे या एक दिवशीय भव्य अशा संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये सत्य, प्रेम, शांती व एकत्वाचा संदेश प्रसारित करत आहेत. यामध्ये सकलजन आपली जात, धर्म, वर्ण, भाषा, वेशभुषा आदि भिन्नता असूनही आपण सर्व एकाच परमात्म्याची लेकरं आहोत. या उक्तीप्रमाणे प्रेम व एकोप्याच्या भावनेचा अंगीकार करतात. समागम कार्यक्रमाच्या जय्यत तयारीत सर्व भक्तगण निष्ठेने कार्यमग्न आहेत.
तरी सर्व भाविक सज्जनांनी या संत समागमात सहभागी होऊन सद्गुरु माताजींच्या दिव्य दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती झोनल इंचार्ज हरिष खुबचंदानी यांनी केली आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com