Uttam Bharat Award: आरोग्य सेवेसाठी डॉ.श्रद्धा परदेशी यांना ‘उत्तम भारत पुरस्कार’
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगरच्या आहार तज्ञ डॉ.श्रद्धा राजेश परदेशी यांना सुदृढ आरोग्य निर्मितीसाठी ‘ग्लोबल ह्युमन राईटस् ट्रस्ट’ च्यावतीने दिला जाणारा आरोग्य क्षेत्रातील ‘उत्तम भारत पुरस्कार’ नुकताच केंद्र शासनाचे उच्च अधिकारी डॉ.संकेत खरपुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आंध्र प्रदेश येथील समाजसेविका डॉ.सत्ती ज्योती, प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, सतिश जयकर, ह्युमन राईटचे राज्य अध्यक्ष डॉ.विनायक सरवडे उपस्थित होते.
डॉ.श्रद्धा परदेशी या गेल्या 18 वर्षांपासून ‘आहार तज्ञ’ म्हणून नगर व पुणे येथे कार्यरत आहेत. दैनंदिन जीवनात सकस व योग्य तो आहार यावर कृतीयुक्त प्रबोधन करत आहेत. अत्यंत दुर्धर अशा रुग्णांना आहारात अमुलाग्र बदल करुन त्यांना निरोगी करण्याचे मौलिक कार्य केले आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात त्यांनी आहाराच्या संदर्भात व्याख्याने देऊन प्रबोधन केले आहे. यासाठी त्यांना लखनौ विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, योग निसर्गोपचार संस्था नाशिक, सार्वदेशिक विरंगना संस्था जम्मू यांनी विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे डॉ.प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया, डॉ.राजीव गवळी, डॉ.संजय आसनानी, डॉ.नितीन वर्पे, डॉ.हेमांगिणी पोतनिस, शाम शर्मा, दत्ता दिकोंडा आदिंनी अभिनंदन केले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com