चैतन्य नवनाथ भक्त सेवा मंडळच्या वतीने आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मायंबा येथील मच्छिन्द्रनाथ यात्रेमध्ये नगरच्या चैतन्य नवनाथ भक्त सेवा मंडळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद ठेवण्यात आला होता त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता तर हजारो नाथभक्तांनी त्याचा लाभ घेतला
मंडळ ३० वर्षापासुन अविरतपणे श्री क्षेत्र मायंबा येथे भंडारा(महाप्रसाद)कार्यक्रम करत आहे १०० कि.पासुन चालु झालेला हा भंडारा आज ७००कि.भरडा,७०० कि.गुळ,७०० कि.तांदुळ,८ डबे गायीचे गावरान तुप व सांबार करीता लागणारे डाळी,तेल,मसाले, इतर साहित्य भाजीपाला असे २५०० कि.पर्यंत पोहोचला आहे.
तर भंडारा करीता १०० x ८०फुट भव्य मंडप उभारण्यात आला होता.बडेबाबांना मंडळाच्या वतीने ५६ भोग,मेंदू वडा,आंबिल घुग-या आणि सांबार,भात,लापशीचा नैवेद्य दाखविण्यात आला होता तर समाधीची विविध प्रकारची फळे आणि रंगीबेरंगी फुलाने भव्य सजावट मंडळाच्या वतीने करण्यात आली होती .
नाथभक्ताच्या अभुतपुर्व गर्दीत हा भंडारा संपन्न झाला नाथभक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यासाठी ५०ते ५५ मुलांची टीम लावण्यात आली होती भंडारा संपन्न होण्यासाठी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे अनमोल सहकार्य लाभले भंडारा संपन्न होण्यासाठी सहकार्य करणार्या नाथभक्तांचे मंडळातर्फे यावेळी आभार मानण्यात आले.
मायंबा येथे पहाटे नाथांच्या महाआरतीनंतर यात्रेस प्रारंभ झाला.नगर, नाशिक,पुणे,औरांगाबाद लोणावळा,बीड,आष्टी गंगापूर,ठाणे या भागातील भाविकांनी गर्दी केली.
होती.देवस्थान समितीतर्फे निवास व्यवस्था,पार्कीग,आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी पुरवण्यात आले.यात्रेनिमित्त मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने रात्री मंदिर खुलून दिसत होते तर नगरच्या चैतन्य नवनाथ भक्त सेवा मंडळ च्या वतीने मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुले व फुग्यांनी केलेली सजावट येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधत होते.

.jpg)
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com