Ahmednagar Congress: जिल्हा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी तालुकावार बैठकांचे नियोजन- जयंत वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक आढावा घेण्यासाठी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तालुका काँग्रेसच्या बैठकांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून 5 मार्च रोजी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुक्यातील तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांनी दिली .
याबाबत अधिक माहिती देताना जयंत वाघ म्हणाले लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना प्रत्येक तालुका काँग्रेसच्या संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यावर तालुक्यातील पंचायत समिती गणाप्रमाणे मंडल काँग्रेसची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून त्यानुसार प्रत्येक मंडळात म्हणजेच पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात प्रत्येक बुथ वर स्वतंत्र बीएलए ची नेमणूक करून त्या ठिकाणी बुथ कमिटी कार्यानित करण्यासाठी व सर्व बीएलए चे प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेण्यासाठी नियोजन करण्याचे महत्त्वाचे काम या बैठकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे व प्रत्येक बुथपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्याचा एक तालुकाभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे याबाबतचे तपशीलवार मार्गदर्शन या बैठकीत करण्यात येणार आहे.
तालुका काँग्रेस कमिटीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष व मंडल काँग्रेसचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व सेल व संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले.
मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता श्रीगोंदा दुपारी 2 वाजता कर्जत तर सायंकाळी 5 वाजता जामखेड येथे तालुका काँग्रेसची विस्तारित कार्यकारणीची बैठक होणार असून या बैठकीसाठी तालुक्यातील जास्तीत जास्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रशांत दरेकर,किरण पाटील व शहाजीराजे भोसले या तालुकाध्यक्षांनी केले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com