शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली सर्वांचे आकर्षण

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण



        अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या ( शिंदे गट)वतीने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली जीवंत देखावा सर्वांचे आकर्षणठरला.  यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  अनिल शिंदेसंपर्क प्रमुख सचिन जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेनेचे अमोल हुंबे पाटीलओंकार सातपुते सह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.

 

        सालाबादप्रमाणे या ही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती नगर शहर शिवसेने तर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली  हया मिरवणुक सोहळयामध्ये पारंपारीक वादयढोलपथकबँड पथकघोडे मावळे,सनई चौघडेफटाक्यांची आतीषबाजी व ध्वनीक्षेपक चित्ररथ यांचा समावेश असतो.



                                                                                                              (फोटो-महेश कांबळे अहमदनगर  )



           शहरात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली  भगवे झेंडेशिवाजी महाराजांचे पोवाडे तसेच जय भवानी जय शिवाजी घोषणांनी नगर शहर दणाणून गेले होते  सायंकाळी  शहरातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आठ मंडळे  सहभागी झाली होती.