राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पाउलबुधे तंत्रनिकेतचा समर्थ राऊत प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेनिक, ब्रह्मपुरी, जि.चंद्रपुर आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये नगर येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी समर्थ राऊत या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला.
ऑनलाईन झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 147 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात समर्थ राऊत याने सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी विभागप्रमुख निलेश निर्मळ, विद्युत विभागाचे विश्वनाथ आदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
समर्थ राऊत याच्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संचालक साई पाउलबुधे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे व पदाधिकारी, शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com