Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा
दिल्लीवरून लोकसभा जागांच्या वाटाघाटीसाठी अमित शाह मुंबईला आले आणि येथे झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही आणि महायूतीच्या जागा भाजप,शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी कोणत्या जागा मिळणार आणि किती जागांवर यांचे उमेदवार असणार याबाबत दिल्लीच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट झाले होते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून कळते आणि या निर्णयवरून शिंदेंना मुंबईच्या जागा सोडाव्या लागल्याचीही माहिती आहे. तसेच अजित पवार यांना हि चार जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
महायुतीमध्ये एक करार झाला आहे ज्यामध्ये भाजप ३१ जागा लढवणार आहे, शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरूर आणि रायगड व्यतिरिक्त परभणी या चार जागांची ऑफर देण्यात आली आहे" असे सूत्रांने सांगितल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
शिंदेंची शिवसेना राज्यात धनुष्यबाणावर लोकसभेच्या 13 जागा लढणार आहे. पण, त्याबदल्यात शिंदेंना मुंबई सोडावी लागली आहे. मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. सध्याचं मुंबईतील समीकरण पाहता शिंदेंकडे मुंबईतील दोन खासदार आहेत. एक राहुल शेवाळे आणि दुसरे गजानन किर्तीकर. राहुल शेवाळेंचा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात आला आहे.एकनाथ शिंदेंनी गजानन कीर्तिकर यांच्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेच्या बदल्यात ठाण्याची जागा मागितल्याचं समजंत आहे.
त्यामुळे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचं तिकीट कन्फर्म झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये करार झाला ज्यामध्ये भाजप 31 जागा लढवणार आहे, शिवसेना 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी अशा चार जागांची ऑफर देण्यात आली आहे.
किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?
शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेना धनुष्यबाणासह राज्यातील 12 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर गजानन किर्तीकरांची जागा त्यांनी भाजपला सोडली आहे. त्यामुळे आता उत्तर-पश्चिम मुंबईतून सलग दोनवेळा खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकरांचं काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशातच शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन किर्तीकरांना विधानपरिषदेवर पाठवलं जाईल.
दरम्यान, शिंदे आणि शाह यांच्यात लोकसभा जागावाटपाबाबतची डील क्लोज झाली असून या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदेंना शब्द देत, आम्ही तुमचा योग्य आदर राखू असं सांगितलं आहे, असंही शिंदे गटाच्या सूत्रांनी सांगितलं.



0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com