chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे'- छगन भुजबळ

chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे'- छगन भुजबळ




मी महायुतीचा प्रचार करेन. मी नाशिकच्या निवडणूकीतून माघार घेत आहे हे जाहीर करतो" अशा शब्दांमध्ये माहिती देत, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.


ते म्हणाले, "अजित पवारांचा होळीदिवशी निरोप आला. देवगिरीवर बैठक झाली. दिल्लीला जी अमित शहांसोबत चर्चा झाली तेव्हा नाशिकबाबत चर्चा झाली. आम्ही समीर भुजबळांचं नाव सुचवलं पण अमित शहांनी छगन भुजबळ यांचं नाव सांगितलं. मग मी चाचपणी सुरू केली. सगळ्यांनी मला पाठींबा दिला. आम्हीही कामाला लागलो."



"देवेंद्र फडणवीसांना फोन केल्यानंतर ते ही म्हणाले, दिल्लीतून छगन भुजबळांनाच उभं राहायला सांगितलं आहे. पण जागा जाहीर झाली नाही. विविध चर्चा झाल्या. मागचे तीन आठवडे जागा जाहीर झाली नाही. अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळातून हा तिढा सुटलेला नाही. 



त्यासाठी लवकर जर निर्णय घेतला नाही तर नुकसान होऊ शकतं. अमित शहा आणि मोदींनी नाव सुचवलं त्यांचा मी आभारी आहे. मी महायुतीचा प्रचार करेन. मी नाशिकच्या निवडणूकीतून माघार घेत आहे हे जाहीर करतो."




 सौजन्य साभार बीबीसी