पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेस रु.65 लाख 52 हजारांचा निव्वळ नफा- चेअरमन किशोर गांगर्डे
अहमदनगर (प्रतिनिधी) - पाटबांरे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन 78 वर्षे पूर्ण झालेली असून, संस्थेने ‘अमृत महोत्सवी’ वर्षात पदार्पण केलेले आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा रु.8 कोटी 32 लाख इतका झाला. सर्व तरतुदी व खर्च वजा जाता संस्थेस सुमारे रु.65 लाख 52 हजारांचा निव्वळ नफा झालेला आहे, असे चेअरमन किशोर भाऊसाहेब गांगर्डे व व्हाईस चेअरमन दिपक किसन वाघ यांनी सांगितले.
संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून, संस्थेची संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर व शेवगांव येथे सभासदांच्या सोईसाठी चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेची सभासद संख्या 1488 असून, स्वत:चे भाग भांडवल रु. 6 कोटी 36 लाख आहे. संचित ठेवी रु.30 कोटी 82 लाखच्या आहेत. वार्षिक उलाढाल रु.309 कोटी झाली आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी संस्थेने सुमारे रु.87 कोटी 22 लाख कर्ज वाटप केलेले आहे.
आर्थिक वर्षाअखेर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे मंजूर कॅशक्रेडिट रु. 25 कोटी पैकी प्रत्यक्षात रु.4 कोटी 34 लाख 98 हजार इतकी उचल झालेली असून, जिल्हा सहकारी बँकेस शेअर्स पोटी रु.2 कोटी 50 लाख व रिझर्व्ह फंड खाती रु.18 कोटी 62 लाखांची गुंतवणुक केलेली आहे. तसेच बँक व्याज दर 12.50 असून, सभासद कर्जाचा व्याज दर 8 टक्के केलेला आहे.
संस्थेच्या आकर्षक ठेवीच्या व्याजदरामुळे ऐच्छिक मुदत ठेवीपोटी मोठ्या प्रमाणात रक्कम संस्थेत जमा होत आहेत. आर्थिक वर्षाअखेर संस्थेत सुमारे रु.54 कोटी 94 लाखांच्या ठेवी जमा आहेत.
संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक हिताची जपवणूक करुन अत्यंत काटकसर व पारदर्शी कारभार केला आहे. तसेच खर्चात जास्तीत जास्त काटकसर केलेली असून, थकबाकी वसूली करणे व थकबाकी प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेचे चेअरमनपदी काम करत असतांना मला व्हाईस चेअरमन दिपक वाघ, संचालक मंडळ, सर्व शाखा कार्यभार प्रमुख,संस्थेचे प्रभारी मुख्य कार्य.अधिकारी दिनक शिंदे, सभासद व संस्थेचे कर्मचारी वर्गाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे, असेही चेअरमन किशोर गांगर्डे यांनी सांगितले.
सभासदांसाठी 1 वर्षे कालावधीकरिता दि.5/4/2024 अखेरचे सभासदांचा चालू वर्षात रु. 6 लाख रकमेचा वैयक्तिक अपघात विमा उतरविलेला आहे, विमा पॉलिसीची मुदत दि.9/4/2025 अखेर आहे. सभासद कल्याण निधीतून मयत सभासदांचे वारसास मदत रु.3,00,000/- तसेच चेअरमन फंडातून तात्काळ रु.10,000/- मदत दिली जाते. शिवाय हृदयशस्त्रक्रिया, किडणी रोपण, कॅन्सर, ब्रेन ट्युमर इतर महत्वाचे व खर्चिक आजारासाठी धर्मदाय फंडातून रु.50,000/- हजारांचे पुढे खर्च झाल्यास आर्थिक मदत केली जाते.
संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष इंजि.एस.व्ही.काळे, उपाध्यक्ष इंजि.ए.ए.पालवे यांनी संचालक मंडळ, सभासद व कर्मचार्यांचे चांगल्या कारभाराबद्दल अभिनंदन केले.
संस्थेच्या कारभारात व्हाईस चेअरमन दिपक वाघ, संगमनेर शाखा कार्यभार प्रमुख अशोक राशिनकर, संतोष जायभाय (श्रीगोंदा), गणेश कवडे (श्रीरामपूर),संदिप शेरकर (शेवगांव), संचालक दत्तात्रय आवारी, सुरेश ढोमसे, देवीदास शेटे, संभाजी यादव, रामदास पालवे, संदिप पवार, जगदिश वाघ, अरविंद वाव्हळ, सौ.अमृता पोळ, संभाजी निमसे, विशाल सरोदे, सौ.अर्चना गायकवाड, सौ.प्रियंका मिसाळ, महेश भावसार, किशोर सांगळे, तज्ञ संचालक राजेंद्र परदेशी, गणेश सुपेकर, प्र.मुख्य. कार्य. अधिकारी दिनकर शिंदे व कर्मचारी वृंद तसेच सभासदांच्या मोलाच्या सहकार्यामुळे संस्थेचे काम प्रगतीपथावर आहे, असे शेवटी चेअरमन किशोर गांगर्डे यांनी सांगितले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com