पुण्यकर्म संकटकाळी आपल्या उपयोगी पडते-श्रीनिवास महाराज घुगे




अहमदनगर (प्रतिनिधी) |


   मनुष्याचे चांगले कर्म हे त्यांच्या पाठिशी नेहमीच राहत असतात. आपला जन्म हा सेवेसाठी झाला आहे. कुटूंबा बरोबरच समाजसेवा, धार्मिक कार्यातून आपणास पुण्य लाभत असते आणि हे पुण्यकर्म संकटाच्या काळात आपल्या उपयोगी पडते. नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी साईबाबांची केलेली भक्ती आणि समाजसेवेमुळे ते मोठ्या अपघातातून बचावले. त्यांचे पुण्यकर्म त्यांच्या कामी आले. काही काळातच ते पुन्हा धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय होतील, असा विश्‍वास हभप श्रीनिवास महाराज घुगे यांनी व्यक्त केला.


     माजी नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांना भागवताचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा  दिल्या. यावेळी निर्मलनगर, शिवनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहात सिद्धेश्‍वर देवस्थानचे बबन नागरे, अनिल काळे, बाळासाहेब आंधळे,  महेंद्र पांडे, जयराम आनारसे, राजीव बागडे, रवी महाराज, सांगळे मेजर, कुताळ, पोळ आदि उपस्थित होते.


     यावेळी सुनिल त्र्यंबके म्हणाले, श्री साईबाबांचे आशिर्वाद आणि थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने मोठ्या अपघातातून आपण बचावलो. मृत्यू समोर असतांना सर्वांच्या सदिच्छामुळे आपणास हे जीवनदान मिळाले आहे. आपले पुण्यकर्म आपल्या कामी आले. यापुढेही धार्मिक, सामाजिक कार्यात सक्रिय राहून जनसेवा करु, अशा भावना व्यक्त केल्या.