Music Exam: ओजस गुजराथी वादन परिक्षेत अहमदनगर केंद्रात प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या मध्यमा पूर्ण या परीक्षेत श्री ज्ञान सरस्वती संगीत निकेतनचा विद्यार्थी ओजस अपूर्व गुजराथी याने सिंथेसायझर या विषयात प्रथम श्रेणी मिळवून नगर केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यास श्री ज्ञान सरस्वती संगीत निकेतनच्या संचालिका संपदा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
चि.ओजस हा ऑक्स्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. तो नगर येथील उद्योजक व टेक्नो सेल्स आणि इंडस्ट्रो सेल्स चे मालक अपूर्व गुजराथी यांचा मुलगा आहे.
चि.ओजस याच्या या यशाबद्दल नातेवाईक,मित्रपरिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com