प्रगत विद्यालयत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

Pragat School: जो जास्त शिकेल तो तितका मोठा होणार-बाळासाहेब बोराटे




    अहमदनगर (प्रतिनिधी)   - प्रत्येकाची प्रगती ही शिक्षणावर अलवंबून असते, जो जास्त शिकेल तो तितका मोठा होणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन कुटूंबाचे, विद्यालयाचे नाव मोठे करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, यासाठी शासनस्तरवर प्रयत्न केले जात आहे.


 त्या माध्यमातून विविध शालेय साहित्य, आहार, पाठ्यपुस्तके मोफत दिले जाते. शाळेतील शिक्षकही आपल्याला चांगले शिक्षण देत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी याची जाणिव ठेवून चांगला अभ्यास करावा. प्रगत विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी चांगले प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या कार्यास आपले नेहमी सहकार्य राहील, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.


     प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रेखे,  सेक्रेटरी सुनिल रुणवाल, कार्यकारणी  सदस्य किरण वैकर, दिव्यांग समावेशित शिक्षणाचे मनपाचे प्रमुख उमेश शिंदे, प्राचार्य सुनील पंडित, मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा धरम, विधाते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शिवाजी विधाते आदि उपस्थित होते.


     यावेळी श्रीमती विजयाताई रेखे म्हणाल्या, संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधितापर्यंत पोहचवून त्यांची प्रगती साधली जात आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही अभ्यास, परिक्षा, क्रीडा, स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश संपादन करुन विद्यालयाच्या लौकिकात भर टाकत आहेत.


     याप्रसंगी सुनिल रुणवाल म्हणाले,  विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांची प्रगती साधली जात आहे. आज दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते. हे विद्यार्थीही इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आपल्या दिव्यांगावर मात करुन यशस्वी होत असल्याचे सांगितले.


     यावेळी प्राचार्य सुनिल पंडित म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. शासनाच्यावतीने मोफत पुस्तके व इतर सेवा-सुविधांचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो. आज मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले आहे. विद्यार्थीही आपली प्रगती साधत असल्याचे सांगितले.


     मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा धरम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.