Supa MIDC: आम इंडिया कंपनी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) -पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मधील आम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या दिनानिमित्त सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा दैनंदिन कामाचा दर्जा उंचावण्यासाठी योग व प्राणायामचा सराव शिबिर घेण्यात आले.
सदर योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी पतंजली योग समितीचे महामंत्री अविनाश ठोकळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठोकळ यांनी रामदेव बाबांचा जो दीड तासाचा अभ्यास आहे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण दिले ते म्हणाले पूर्वी योग हा फक्त हिमालय व गुफेतच ऋषीमुनी करत असत परंतु आज स्वामी रामदेव महाराजांनी तो जनसामान्य पर्यंत पोहोचविला आहे तसेच आजच्या कार्पोरेट सेक्टर मध्ये कामाचा दर्जा उंचावण्यासाठी योग फार महत्त्वाचा आहे
सध्या तरुण पिढीमध्ये नशेचे प्रमाण देखील खूप वाढले असून तरुणांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी देखील योगाचा फायदा होऊ शकतो तसेच आज जागतिक योग दिनानिमित्त कंपनीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहनही देखील त्यांनी केले
याप्रसंगी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नितीन झरेकर,स्टाफ ,कर्मचारी व कामगार उपस्थित होते
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com