Ahmednagar BJP: लाडकी बहीण योजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अहमदनगर भाजपाची जिल्हाधिकारीकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अशी मागणी नगर भाजपाने आज जिल्हाधि
निवेदनात म्हटले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,लोकनेते देवेन्द्र फडणवीस उपमुख्यमंत्री,अजितदादा पवार यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी यांचे अर्ज येणार असून, सदर अर्जांची छाननी करण्यासाठी व लाभार्थी निश्चित करण्यासाठी सध्या असलेल्या कर्मचारी वर्ग हा अपूरा पडू शकतो व कर्मचारी कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडू शकतो व वेळेत या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार नाही असे वाटते.
आम्ही आपणास विनंती करतो की, या योजनेसाठी आलेल्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा ज्यात अधिकारी, कर्मचारी व अन्य कर्मचारी वर्ग तातडीने नेमण्यात यावा जेणे करून लाभार्थी यांची निवड होऊन, त्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेल व माझ्या बहिणीला या माध्यमातून छोटीशी मदत होईल.
सदर योजनेमध्ये काम करणारे कर्मचारी यांची अधिसंख्य पदे तयार करण्यासाठी आपले मार्फत शासनास प्रस्ताव सादर करावा किंवा अन्य विभागातून प्रतिनियुक्तीवर कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com