खा निलेश लंके च्या हस्ते वैष्णव मंडळाच्या दिंडीचे पूजन 

Ahmednagar Dindi: खा निलेश लंकेच्या हस्ते वैष्णव मंडळाच्या दिंडीचे पूजन



              अहमदनगर (प्रतिनिधी)- वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने  सालाबादप्रमाणे पायी दिंडी सोहळा पंढरपूर आषाडी  दिंडी साठी  प्रस्थान पूजा खा निलेश लंके यांच्या हस्ते  कपिलेश्वर महादेव मंदिरमाळीवाडा येथे पादुका, प्रतिमा व रथाचे पूजन करण्यात आले.


 यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौदर ,संभाजी कदम,विक्रम राठोड,सुनील  त्रिपाठी , ईश्वरसिंग  परदेशी,भगवान मोकाटे,विनायक खेडकर,सुनील दातरंगेराजेंद्र  फुलारी , गणेश सुडकेभारत बोरसे आदींसह मोठया संख्नेने भाविक व दिंडीत सहभागी होणारे वारकरी उपस्थित होते.


          यावेळी.दिंडीची वाहन व्यवस्था(ट्रक)संतोष मेहेत्रेजल व्यवस्था राजेंद्र  फुलारी,डिझेल सेवा अहिल्या  बीर,रथ  सेवा  बबन महाराज  गुंजाळ व गिरीश जाधवट्रॅक्टर सेवा अंकुश  तरटे तर  पंढरपूर निवास व्यवस्था रावसाहेब  भगत  कैलास  मोकाटेपालखी सेवा अनिल  शर्मा , किर्तन सेवा बाळकृष्ण महाराज खेसे यांचे सत्कार खा निलेश लंके यांच्या हस्ते करून सन्मान करण्यात आला.