मोहंमद रफी यांच्या आवाजामुळे त्यांनी गायलेली गीते अजरामर झाली- डॉ कमर सुरुर
अहमदनगर- कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत आवाजाची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही.
या कार्यात मोहंमद रफी हे त्यांच्या आवाजामुळे त्यांनी गायलेली गीते अजरामर झाली आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव व आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर यांनी केले.
जावेद मास्टर ग्रुप च्यावतीने स्व.मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘महफिले रंग रफी के संग ’चे रहमत सुलतान सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ कमर सुरुर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर,अमृत मुथा, राजुभाई शेख, डॉ शमा, देवदत्त पाऊलबुद्धे, आरिफ सय्यद, राजा भैय्या आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोहंमद रफी यांना अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना युनूसभाई तांबटकर म्हणाले की, आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोर गीतकारांच्या जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून होणार्या या गायनाच्या कार्यक्रमातून नवीन कलाकारांना संधी प्राप्त होत आहे. अशाच कार्यक्रमांद्वारे छोटे कलाकार टी.व्ही. व सिनेमात सुद्धा पोहचत असून, कलाकारांना रोजगार प्राप्त होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात सुनील भंडारी व रोहीणी दिवटे यांनी मोहंमद रफी यांचे गाजलेले गीत ‘पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है ’ या गीताने प्रारंभ केला. तसेच ‘पत्थर के सनम तुझे हमने ’, ‘नफरत की दुनिया को छोडकर’. यानंतर अन्वर शेख यांनी ‘कोई जब राह ना पाए ’ व ‘ओ मेरी महबुबा ..’ हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळविली. अन्सार शेख यांनी ‘ले गई दिल गुडीया जापान की व बेखुदी मे सनम ..’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर दिनेश मंजरतकर यांनी ‘तुझको पुकारे मेरा प्यार .. मेरी आवाज सुनो ..’ व ‘झिलमिल सितारों का आंगन होगा ..’ या गीतांनी माहोल दाटला.
तर जावेद मास्टर यांनी ‘दिल की आवाज भी सुन मेरे फसाने पे ना जा व मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता ..’ हे प्रेम गीत सादर करुन वाहऽ वाह ऽ मिळविली. विद्या तंन्वर यांनी जुन्या काळातील ‘युंही तुम मुझसे बात करती हो या कोई प्यार का इरादा है.. हे गीत सादर करुन टाळ्या मिळविल्या. तर लकी ड्रॉ द्वारे प्रवेश मिळालेले सुलतान भाई यांनी ‘ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही ..’ हे गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी दिवटे यांनी ‘तुम मुझे युं भुला ना पाओगे..’ या गीताने सभागृहाला हेलावून कार्यक्रमाचा समारोप केला. ध्वनी मुद्रण शांती ऑडिओचे दिनेश भाई यांनी अति उत्तम रित्या पार पाडले.
सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी सभागृहाला हसत खेळत शेर शायरीच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या पार पाडले. प्रास्तविक जावेद मास्टर यांनी केले तर आभार दिनेश मंजरतकर यांनी मानले. कार्यक्रमास मोहंमद रफी यांचे गीतप्रेमी व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व सर्वांनी कार्यक्रमाचे व आयोजकांचे भरभरून कौतुक केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com