साईबन मधील  ब्रम्हा ब्रिजझुलता पुल पर्यटकांचे आकर्षण ठरला 

साईबन मधील  ब्रम्हा ब्रिज, झुलता पुल पर्यटकांचे आकर्षण ठरला



           अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील  साईबनमध्ये साहसी क्रीडा प्रकारात झिप लाईन,पाण्यावरील बलून,ऍडव्हेंचर गाड्या व बाईक बरोबर आता ६ महिन्यापूर्वी नवीन बांधलेला ब्रम्हा ब्रिजझुलता पुल लहान मोठ्या सर्वच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे, येथे मनोरंजनाच्या साधनाबरोबर साहसी खेळ असल्याने मुलांचा आनंद तर द्विगुणित झाला आहे.येथील तलावाच्या वर दोन टोकाला  हा पूल बांधण्यात आला असून त्यावर चालताना तो झुलतो,खाली पाणी व वर आकाश पाहताना उत्तराखंडहिमाचल प्रदेश मध्ये असल्याचा भास होतो 


        नगर मधील शिर्डी रोडवरील  नागापूर एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबनमध्ये  हे एक नवीन आकर्षण पर्यटकांना झाले आहे  सध्या हुरडा पार्टी साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक साईबनला येत आहेत ते याचा आनंद घेत आहेत अशा पद्धतीचा पूल नगर जिल्हात कृषी पर्यटन केंद्रात नाही.त्यामुळे  क्रीडा आणि पर्यटन दोन्ही होते व लोकही मोठ्या उत्साहाने त्याचा आनंद घेत आहेत.साहसप्रेमींसाठी आता साईबन हे  आवडीचे केंद्र बनत आहे व लोकांना या प्रकारचे खेळ खूप आवडतात. 


         तसेच ब्रह्मा पुलाचा उपयोग लष्कराच्या प्रशिक्षणात केला जातो.यामध्ये दोरीवर चालताना समतोल साधावा लागतो,तो बचावातही उपयुक्त ठरतो.त्याबरोबर झिप लाइन आणि  पाण्यावरील बलून,ऍडव्हेंचर गाड्या व बाईक  हे सुद्धा असेच साहसी खेळ आहेत.साहसप्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण बनत आहे पर्यटन,भरपूर खेळण्याची साधनेवन भोजन येथे आहेत हे सर्व पाहण्यासाठी आणि धम्माल अनुभवण्यासाठी  लोक एक दिवशीय सहली साठी येत आहेत