वर्धमान तरुण मंडळाच्यावतीने त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकर्यांना अल्पोहार वाटप
वारकर्यांची सेवा केल्याने पुण्य मिळते - बाळासाहेब चंगेडे
अहमदनगर (प्रतिनिधी) - आषाढी एकदाशी आली की, वारकर्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागत असते. लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीने पंढरपुला जातात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे वारकरी न थकता शेकडो मैल प्रवास करतात. आपल्या लाडक्या पांडूरंगाला भेटची आस लागली असल्याने तहान-भुक हरपून चालत राहतात. या वारकर्यांची सेवा केल्याने पुण्य मिळत असल्याने त्यांच्या सेवेत धन्यता मानली आहे.
वर्धमान तरुण मंडळाच्यावतीने या दिंडी वारकर्यांनी अल्पोहार वाटप करण्यात आले आहे. गेल्या 30 वर्षांपासून दिंडीतील वारकर्यांची मनोभावे सेवा मंडळाच्यावतीने करण्यात येत असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब चंगेडे यांंनी केले.
खिस्तगल्ली येथील वर्धमान तरुण मंडळाच्यावतीने त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज दिंडीतील वारकर्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चंगेडे, उपाध्यक्ष किरण शिंगी, प्रविण कोठारी, संतोष भंडारी, बबन चंगेडे, भुषण चंगेडे, प्रशांत डागा, राजू बंब, निखिल फिरोदिया, प्रज्योत भंडारी, पियुष लुंकड, अमोल शिंगी, श्रेणिक शाह, मयुर पवार, नंदकुमार गुजराथी आदिंसह सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष किरण शिंगी म्हणाले, गणेशोत्सवाबरोबरच, क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, अन्नदान असे उपक्रम जयंती, उत्सवानिमित्त वर्धमान तरुण मंडळाच्यवतीने राबविण्यात येत असतात. या उपक्रमात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीतील वारकर्यांची सेवाही मंडळाच्यावतीने दरवर्षी करण्यात येत असते. या वारकर्यांना अन्नदानाबरोबरच आरोग्यसेवा व आवश्यक वस्तूंचेही वाटप केले जात असते. आज निवृत्तीनाथांच्या दिंडीतील वारकर्यांचे स्वागत करुन मोठे समाधान लाभल्याचे सांगितले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com