अरणगाव(मेहराबाद)ला द्वादशीला रथयात्रा संपन्न  

अरणगावला द्वादशीला रथयात्रा संपन्न


         अहमदनगर (प्रतिनिधी) -  संतांची पावन भूमी असलेल्या  अरणगाव येथे संत बुवाजीबुवा महाराज व अवतार मेहेरबाबा  यांच्या संजीवन समाधी असलेल्या पुण्य भूमीत अखंड हरीनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. त्याची सांगता आज दुपारी रथ यात्रेने करण्यात आली. 

 

         आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी  द्वादशीला साक्षात पांडुरंग अरणगाव(मेहराबाद)येथील  संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात.अशी आख्यायिका आहे. त्यामुळे येथे दरवर्षी मोठा उत्सव होत असतोयावर्षी  परिसरातील व नगरमधील सुमारे २० हजार भाविक येथे  उपवास सोडण्यासाठी आले होते.तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आषाडी एकादशी निम्मित द्वादशीच्या दिवशी गावातून रथयात्रा काढण्यात येते.


            उत्सवानिमित्त आषाढी सप्ताह,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.११ जुलै पासून सुरु झाला होता.यामध्ये रोज  काकडा भजन विष्णु सहस्त्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन,हरिपाठ,आरती,रात्री  कीर्तन नंतर गावोगावीचे जागर झाला.तर कीर्तनामध्ये  अमोल महाराज सातपुते,मनोहर महाराज शिनारे,बंडोपंत महाराज शेळके,राम महाराज पठाडे,डॉ राधाकृष्ण महाराज अकोलकर,लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांचे कीर्तन झाली.

 

                 एकादशी महापुजा खा.निलेश लंके,संदेश कार्ले यांच्या हस्ते झाली.तर द्वादशीची महापुजा  माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,स्वाती दिपक कालें,कचरू बारस्कर  यांचे हस्ते झाली. सकाळी रामदास महाराज रक्ताटे  यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद संपन्न झाला.  तर दुपारी  रथ मिरवणूक पूजा राजेंद्र दळवी,सरपंच पोपट पुंड,उपसरपंच विठ्ठल दळवी,अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले,राजु प्रसाद यांच्या हस्ते  झाली व रथयात्रा सुरु झाली,मिरवणुकीत लाकडी रथ भाविक ओढत होते तर त्यापुढे भजनी मंडळव लेझीम पथक होते.

  

              सर्व कार्यक्रमाचे  आयोजन श्री पांडुरंग बुवाजीबुवा समाधी देवस्थान ट्रस्ट,अरणगाव व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ अरणगाव यांनी केले  सर्व कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती