वसंत टेकडीच्या साई मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रत्येका मध्ये माया लपलेली असते, तिला १० मुले व ६ मुली आहेत ते कधीना कधी जागृत होतात तर तिची मैत्रीण इच्छा पण येते त्यामुळे मानवाचे जीवन दुःखी बनले आहे. हे सर्व जण भजनाला घाबरतात व शरीरातून निघून जातात, म्हणून सुखी जीवन जगायचे असेल तर आपण व आपल्या मुलांना भजने,पसायदान ,हरिपाठ शिकवा असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले
सावेडी उपनगरातील वसंत टेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा व मंदिराचा ११ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमांत ते बोलत होते.यावेळी निखिल वारे,बाळासाहेब पवार,बबलू सूर्यवंशी,नगरसेवक व मंदिराचे संस्थापक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळे आदी सह मोठ्या संख्येने भाविकउपस्थित होते
जगात मूर्खांना किंमत आणि सज्जनांना त्रास सुरू आहे.खरे बोलला कि संपविला याचा प्रत्येय मला आला आहे असे सांगून ते म्हणाले सुनील त्र्यंबके व श्री.साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे गुरुपोर्णिमेनिम्मित हा भव्य कार्यक्रम कार्यक्रम ठेवला आहे,कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील व शहरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com