स्वराली आडसूळ इ.5वी तर सुयश फुंदे इ.8 वी गुणवत्ता यादीत
अहमदनगर (प्रतिनिधी) - राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इ. 5 वी व इ.8 वी शिष्यवृत्ती परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल मधील कु.स्वराली काकासाहेब आडसूळ (इ.5 वी) हिने शहर विभाग जिल्हा गुणवत्ता यादीत 32 वा क्रमांक पटकाविला.
तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश सुनिल फुंदे (इ.8 वी) याने शहर सर्वसाधारण यादीत 93 वा आला.
या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक मुथा, स्कूल कमिटीचे चेअरमन गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे भूषण भंडारी यांनी सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com