हिंदी कविता - लघुकथा लेखन स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील डॉ.शंकर केशव आडकर चॅरिटेबल ट्रस्ट व हिंदी सृजन सभा यांच्या संयुक्त विद्यमाने इ.9वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी कविता - लघुकथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट कविता - लघुकथाकरांचा हिंदी दिनी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती हिंदी सृजन सभेच्या अध्यक्ष व नगर कॉलेज हिंदी विभागप्रमुख प्रा.ऋचा शर्मा यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होणार्या इ.9 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांनी आपली कविता स्वरचित असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ती व्हॅटस्अप, फेसबुक वरुन घेतलेली नसावी. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनी नगर कॉलेजमध्ये रोख व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
लेखन सादर करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2024 असून, इच्छूकांनी डॉ.ऋचा शर्मा (मो.9370288414), सोमनाथ नजन (मो.9422726184), भरत झंवर (मो.9595222630) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com