डोंगरगण वरून स्वावलंबी पायी दिंडीचे प्रस्थान 

डोंगरगण वरून स्वावलंबी पायी दिंडीचे  प्रस्थान



              अहमदनगर (प्रतिनिधी)-येथून जवळच असणाऱ्या डोंगरगण येथील गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश योगाश्रम संस्था सालाबाद प्रमाणे श्री डोंगरगण ते पंढरपूर आषाडी  दिंडी सोहळा प्रस्थान झाले असून दिंडीचे हे ३४ वे वर्ष आहे दुपारी श्री रामेश्वराचे पूजन करण्यात आले



 यावेळी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री,भागवत महाराज जंगले,सुधाकर पवार,राधाकृष्ण भुतकर.आर्किटेक अनिल साळुंके आदींसह आश्रमाचे विदयार्थी,सहभागी वारकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्नेने उपस्थित होते.

 


         रामेश्वर पूजनानंतर मंदिरात भजन म्हणून दिंडीला प्रारंभ झाला दिंडी वरती आल्यावर रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेहि स्वावलंबी पायी दिंडी असून सहभागी होणाऱ्या वारकर्यांनी  दिंडीत चालताना पुरुषांचा पांढरा पोषाख घालावा लागतो तसेच  दिंडीतील शिस्त व व्यवस्था ज्यांना मान्य असेल त्यांनीच दिंडीत प्रवेश दिला जातो. 



          गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांची दिंडी हि शिस्तबद्ध असते. यामध्ये सुशिक्षित,सरकारी नोकरदार,अधिकारीउद्योजक तसेच आश्रमातील विद्यार्थ्यांचा  मोठा सहभाग असतो,दिंडी कोठीही रोडवर थांबत नाही,ठरलेल्या ठिकाणी जेवण,चहा व नास्ता घेते. 


रस्त्याने अखंड कीर्तन-भजन वारकरी म्हणत असतात पाण्याची व स्वच्छता गृहाची व्यवस्था दिंडीबरोबर असते. तर झालेला कचरा दिंडी निघताना सर्व स्वच्छ केला जातो हि दिंडी स्वयंपूर्ण असल्याने तिला स्वावलंबी पायी  दिंडी म्हटले जाते