निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी सोहळ्याला वैष्णवांचीनगर येथे गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी) -संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळ्यात विश्वगुरूंचा भव्य जयजयकार सोहळा झाला. या वेळी हजारो वारकरी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी व दिंडी नगर येथे दोन दिवस मुक्कामी असते. परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर व अहमदनगर याठिकाणी हा सोहळा ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला वारकऱ्यांच्या उपस्थित होते. समाधीचे अभंग गायन झाल्यानंतर फुले उधळत मोठ्या भक्तीभावाने वारकऱ्यांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला संजीवन समाधी घेतली होती. त्यांचा ७२७वा संजीवन समाधी सोहळा गुरुवारी अहमदनगर येथे परंपरेप्रमाणे संपन्न झाला. नाथांचा मुखवटा व पादुका पालखीतून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या असतात, त्यामुळे मार्गात नगर येथेच परंपरेप्रमाणे भव्य असा, तर त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिरात छोटेखानी सोहळा होत असतो.
अहमदनगरच्या मार्केट यार्ड भागात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. प्रथम नाथांच्या पादुकांना अभिषेक व महापूजा करण्यात आली . जयंत महाराज गोसावी यांनी निवृत्तीनाथांचे सांगितले.कीर्तनानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.यात माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सर्व विणेकरी यांच्या कडून फेटे देण्यात आले.
यावेळी बाजार समिती, मार्केट कमेटी,हमाल पंचायत , व्यापारी मंडळ यांनी केलेल्या सह्कार्यबद्दल आभार माणून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच दरवर्षी सहकार्य करणारे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचा सन्मान देवस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे सचिव अमर ठोंबरे, पालखीप्रमुख नारायण मुठाळ,विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे,विश्वस्त राहुल साळुंके माजी अध्यक्ष नीलेश महाराज गाढवे,माजी सचिव सोमनाथ घोटेकर, डॉ रामकृष्णदास महाराज लहवितकर, पालखीचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे,एकनाथ महाराज गोळेसर,गणपत गाडेकर,पंडित कोल्हे, पुंडलिक थेटे ,समाधी संस्थानचे परंपरागत पुजारी जयंत महाराज गोसावी व अनिल महाराज गोसावी,हमाल पंचायत संघाचे अध्यक्ष अविनाश घुले, , सचिन जगताप आदी उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com