कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिंडीचे स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी) - संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगरमधील बाजार समिती मध्ये आगमन झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केट कमिटीच्या वतीने मा मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करुन पालखीची पूजा, आरती करण्यात आली.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,युवा नेते अक्षय कर्डीले, सभापती भाऊसाहेब बोठे,उपसभापती रभाजी सुळ, संचालक सुधिर भापकर, संजय गिरवले, मधुकर मगर,सुभाष भाऊ निमसे, भाऊ भोर, राजु आंबेकर,मनिषा घोरपडे,आचल सोनवणे, संतोष म्हस्के,धर्मनाथ आव्हाड, हरीभाऊ कर्डिले,भाऊसाहेब ठोंबे,दत्तात्रय तापकीरे,सुप्रिया कोतकर,राजेंद्र बोथरा,निलेश सातपुते आदींसह मोठ्या संख्नेने कार्यकर्ते उपस्तिथ होते.
कर्डीले यावेळी बोलताना म्हणाले वारी हा आनंदाचा क्षण आहे दिंडीत आगळा वेगळा आनंद मिळतो, आपली सर्व सुख दुःखे विसरून वारकरी यामध्ये सहभागी होत असतो बाजार समिती ,मार्केट कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे व दिंडी ला सर्व सहकार्य केले जाते
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com