Ahmednagar Police: मोटारसायकल चोरून पार्टची विल्हेवाट लावणार्या आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
अहमदनगर :
मोटार सायकल चोरून त्यांच्या पार्टची विल्हेवाट लावणार्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांच्या पथकांने ही कारवाई केली. आरोपींकडून पोलिसांनी सात मोटार सायकल हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.
रोहित आप्पासाहेब शिरोले, यश प्रकाश ओहळ, करण कैलास पवार, इम्राण सलिम शेख अशी अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई दिनांक १८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान गोपीनाथ तुकाराम घुसाळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलिसांना माहिती समजली की, गाड्यांचे पार्ट सुट्टे करून त्यांची विक्री होती असल्याचे समजले.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना माळीवाडा परिसरात असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com