तूळजाभवानी देवीच्या श्रम निद्रापर्वासाठी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) घराण्याकडून जाते हळद
अहमदनगर । दर्शक :
श्रावण महिन्यात चाहूल लागते ती श्री तुळजाभवानी देवीच्या पलंगोत्सव सोहळ्याची.काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरवात होईल.घोडेगाव-जुन्नर-अहमदनगर-तुळजापूर असा पलंगाचा पायी प्रवास असतो.पलंग दसऱ्याच्या आधल्या दिवशी तुळजापूर मध्ये पोहोचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता सीमोल्लंघन खेळून या लाकडी पलंगावर निद्रिस्त होते.कोजागिरी पौर्णिमेला देवी पुन्हा श्रमनिद्रा संपवून सिंहासनावर विराजमान होते.
ज्यावेळी देवी पलंगावरून सिंहासनावर विराजमान होणार असते.त्यावेळी देवीच्या संपूर्ण मूर्तीला हळद लावली जाते.ही हळद अहमदनगर येथील तुळजापूर देवी मंदिराचे पुजारी आणि पलंगाचे मानकरी पलंगे(तेली)कुटुंबातील सुवासनी,कुमारीका,महिलाकडुन दरवर्षी श्रावण महिन्यात जात्यावर देवीच्या महिमेची गाणी गात देवीची दळलेली हळद आणि तुळजापूर मधील वाघे मंडळी यांचा भंडारा(हळद)देवीच्या मूर्तीस लावतात.मग देवीची मूर्ती पलंगावरून उचलून सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जाते.
दुपारी हि हळद दळण्यात आली,प्रथम मंदिरातील देवीची महिलांनी पूजा केली,मुलींनी जाते सुंदर रित्या सुशोभित केले होते.नंतर महिलांनी यावर हळद फोडून ती दळली
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com