गोगादेव जन्मोत्सव (बागड) निम्मित शोभायात्रा संपन्न 

गोगादेव जन्मोत्सव(बागड)निम्मित शोभायात्रा संपन्न




अहमदनगर : दर्शक । 

             भगवान विर गोगादेव जन्मोत्सव(बागड)शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये अहमदनगर परिसरातील मनाच्या ५ काठ्या निशाण सहभागी झाले होते यावेळी मोठ्या संख्नेने भाविक,समाज बांधव व नागरिक सहभागी झाले होते अशी माहिती माजी महापौर दीप चव्हाण यांनी दिली 


             अहमदनगर शहरात श्रावण महिन्यात भगवान विर गोगादेव यांचे उपवास वाल्मिकी समाज मोठ्या आनंदी उत्साह व धार्मिक रीतीने पाळीत आहे.हे उपवास नांगपंचमी पासून ते श्रीकृष्ण गोपाळकाला पर्यंत असतात.दरवर्षी प्रमाणे कापडबाजार येथील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा येथील मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये नगर मधील मानाच्या ५ काठ्या निशाण सहभागी झाले होते. निशाणावर भगवान शंकर,विष्णू,गोगादेव मंदिराच्या मूर्ती  होत्या,तर काठ्यांना आकर्षक अशी लाइटिंग करण्यात आली होती 


             शोभायात्रा मिरवणूक(बागड)मध्ये ढोलपथक,वाद्यपथक,बॅण्ड पथक,आकर्षक रथ,लाइटिंग सह ढोल ताशांच्या गजरात धार्मिक पद्धतीने काढण्यात आली.मिरवणुकीचा प्रारंभ भिंगारवाला चौकातून झाला मानाचे निशाण एका मागून एक सहभागी झाल्या होत्या त्याची मोरपिसे व लाइटिंग लांबून हि खुप सुंदर दिसत होती मिरवणूक मध्ये सर्व समाजातील लोक मोठ्या उत्साहाने देवाच्या दर्शनासाठी सहभागी होत होते तर अनेक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत व पूजा करण्यात आली,


          मिरवणूक कापडबाजार,तेलीखुंट,सर्जेपुरा मार्गे मंदिरात आली तिथे गोरक्षनाथ व गोगादेव यांचे निशाणांनी दर्शन घेऊन उभ्या करण्यात आल्या,यावेळी मंदिराचे प्रमुख माजी दीप महापौर चव्हाण यांच्या हस्ते निशाणाचे मानकरी,भगत यांचा सन्मान करण्यात आला,मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर परिसरात यात्रेचे वातावरण होते असंख्य दुकाने , खाद्यपद्रार्थ चाय गाड्या होत्यादुपारपासूनच दर्शनाला भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर उपस्तिथ सर्वाना महाप्रसाद देण्यात आला