अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त  रक्तदान शिबिर संपन्न 
Blood Camp: अपघात ग्रस्त व्यक्तीला रक्तदानामुळे  जीवदान मिळू शकते : आमदार संग्राम जगताप


           अहमदनगर (प्रतिनिधी)-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती व विजुभाऊ पठारे मित्र मंडळ यांच्या  वतीने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त लालटाकी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,त्यास चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे ७० युवकांनी रक्तदान केले. 



      सकाळ पासून दुपारपर्यंत अभिवादन करण्यास येणाऱ्यांनी व विजुभाऊ पठारे मित्र मंडळच्या कार्यकर्त्यानी रक्तदान केले.यावेळी आमदार संग्राम जगताप,उत्सव समितीचे अध्यक्ष विजुभाऊ पठारे,साहेबराव पाचारणे,अशोक गायकवाड,सुरेश बनसोडे,अविनाश घुले ,आकाश आवटी,गणेश पठारे,संदीप ठोकळ ,गणेश गायकवाड,रवी उमाप ,मयूर चावरे ,निलेश पवार ,संदीप पठारे आदी आदींसह मोठ्या संख्नेने समाज बांधव  होते. 



       अपघात ग्रस्त व्यक्तीला रक्तदानामुळे  जीवदान मिळू शकते रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येक गरजूला वेळीच रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अशा शिबिराची गरज आहे असे प्रतिपादन आ जगताप यांनी केले.