Delhigate: जानव्ही सागावकर ठरल्या दिल्लीगेटला पैठणीच्या मानकरी
अहमदनगर (प्रतिनिधी) :
भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सवास निम्मित दिल्लीगेट येथील भगवान जिव्हेश्वर मंदिर प्रागंणात होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये जानव्ही सागावकर या प्रथम येऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या तर द्वितीय साक्षी दळवी व तृतीय वैष्णवी अष्टेकर ठरल्या यावेळी मोठ्या संख्नेने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता
मेमोरेबल इव्हेंटचे संचालक प्रसिद्ध निवेदक चेतन गायकवाड,चिन्मय गायकवाड व त्यांच्या टीमने याचे संचालन केले. तर मीनल बोरा यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी ईश्वर बोरा,गणेश कवडे,प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,गिरीष जाधव,बाळासाहेब बोराटे,सुवर्णा गेनप्पा,सचिन शिंदे ,शामभाऊ नळकांडे, सोनली चितळे,महेंद्र भैय्या गंधे, मा महापौर अभिषेक कळमकर ,अरविंद धिरडे,संजय सागांवकर आदी मान्यवर उपस्थित होते
महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा ,होम मिनिस्टर कार्यक्रम अभूतपूर्व उत्साही वातावरणात पार पडला. मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला. दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली.उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला.
सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. १६ वर्षांपासून ते ६० वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वनिता मानकर,कल्याणी पावले,शैला मानकर,वनिता सावेकर,अनिता मानकर,वैशाली टोणपे,रूपाली टोणपे,मनिषा खडामकर,ज्योती पारखे,विशाखा मानकर आदींसह संजय सागांवकर,नितीन पावले,राजेंद्र सवई,रोहित सावेकर,किरण पारखे ,मुकुंद सावेकर,योगेश मानकर ,सचिन पावले,सागर सावेकर,सौरभ सावेकर,संतोष सावेकर, गणेश सवई,कार्तिक कडव ,सचिन मानकर, सचिन क्षिरसागर आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाने प्रयत्न केले
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com